TSK

TSK · उत्प 6:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते.

एखादा हे कराराचे बोलणे ऐकूनही, मी मला हवे तेच करणार. माझे चागंलेच होईल असे स्वत:चे समाधान करून घेत असेल. तर त्याचा त्यास त्रास होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळून जाईल.

तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, ज्यावर दुष्टजण चालले.

देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, जर तेथे कोणी समजदार आहे, आणि जो देवाचा शोध घेतो.

¶ मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे.

हे यरूशलेमे, तू तारली जावी, म्हणून तू आपल्या हृदयातील पाप धुऊन काढ. “पाप कसे करावे” हे तुझ्या मनातील खोल विचार किती काळ राहतील?

तेव्हा तो मला म्हणाला, “जा आणि दुष्ट घृणास्पद गोष्टी होतांना आपल्या डोळ्यांनी पाहा.”

‹कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.›

¶ आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.

¶ आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता,