TSK

TSK · इब्री 5:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते त्या मार्गापासून किती लवकर ते बहकून गेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ती केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्यास बली अर्पणे वाहत आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएला, याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.”

¶ मग मिर्याम व अहरोन मोशेविरूद्ध बोलू लागले. कारण त्याने एका कुशी-स्त्रीशी लग्न केले.

मोशे आणि अहरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय?

मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर, इस्राएलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा.”

¶ जर मला अभिमान बाळगायचा असेल तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीविषयी अभिमान बाळगीन.

आणि त्याने मला म्हणले की, ‹‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’› म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;

जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.

कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.

तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, जे लंगडे त्यास मार्गातून घालवले जाऊ नये, तर त्यापेक्षा त्याने निरोगी व्हावे.