TSK

TSK · विला 2:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या. त्यापैकी दोन रांगांतील लोकांस ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांस जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली.

माझ्या विरुध असलेला तुझा हात कडून घे, आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.

आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन. मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल.

मी न्याय मोजमापाची काठी, आणि नितीमत्ता हा ओळंबा असे करीन, तेव्हा गारपीट खोट्यांचे आश्रय झाडून टाकील, आणि पूराचे पाणी लपण्याच्या जागा झाकून टाकील.”

तिच्या द्राक्षवेलींच्या माळीवर चढून जा आणि नाश कर, परंतू त्यांचा संपूर्ण नाश करु नकोस. तिच्या द्राक्षवेलीची काटछाट कर, कारण ती द्राक्षवेल परमेश्वराकडून नाही.

त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.

परमेश्वर शत्रूसारखा झाला. त्याने इस्राएलांस गिळले. त्याने तिच्या बलस्थानाचा नाश केला आहे. त्याने यहूदाच्या कन्येमध्ये शोक व विलाप वाढवला आहे.

परंतू मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला ह्यासाठी की ज्या राष्ट्रातून इस्राएलांना मी बाहेर त्यांच्या दृष्टीसमोर माझा अनादर होऊ नये, म्हणून मी कृती केली आहे.