TSK

TSK · मला 1:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ एखाद्याला दोन स्त्रिया असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.

अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल, आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल.

हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचर प्राणीही तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल.

म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”

पण एसावाचे कपडे काढून त्यास उघडे केले आहे. मी त्याची लपण्याची ठिकाणे उघड केली आहेत. म्हणून त्याच्याने आपल्याला लपवता येत नाही. त्याची मुले, भाऊ व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत आणि तो गेला आहे.

बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत, चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल.

त्यास सांग, ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, सेईर पर्वता, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला उजाड व दहशत करीन.

“म्हणून तू भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, ‘कारण त्यांनी तुमचा नाश केला आणि तुम्ही उरलेल्या राष्ट्रांना वतन व्हावे म्हणून त्यांनी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही लोकांच्या तोंडी व जिभेने व गोष्टीचा निंदेचा विषय असे झाले आहात.”

कारण पाहा, मी तुम्हास अनुकूल आहे, आणि मी तुम्हाकडे वळेल, मग तुम्ही मशागत केलेले, व बी पेरलेले व्हाल.

मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल, कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला अदोम ओसाड रान होईल, कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले.

याकोबाचे घराणे अग्नी होईल, आणि योसेफाचे घराणे जाळ होईल, आणि एसावाचे घराणे भूस होईल, आणि ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही. कारण परमेश्वर असे बोलला आहे.