TSK

TSK · मत्त. 12:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस;

सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्यास अवश्य ठार मारावे.

¶ यावेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात राहत होते. एका मनुष्यास जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्यास ते करताना पाहिले.

सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”

असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता.

येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, ‹“शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?”›

¶ लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. तो दिवस शब्बाथ दिवस होता.

येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ‹“मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता.›