TSK

TSK · मत्त. 22:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अश्शूरास धिक्कार असतो.

तू माझा लढाईचा हातोडा आहेस, माझे लढाईचे हत्यार आहेस. तुझ्याबरोबर मी राष्ट्रांना मोडून तुकडे तुकडे करीन आणि राज्यांचा नाश करीन.

परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचावतो, त्याचे योद्धे खूप असंख्य आहेत, कारण जो कोणी त्याची आज्ञा आमलात आणतो तो बलशाली आहे. कारण परमेश्वराचा दिवस हा मोठा आणि फार भयंकर आहे. त्यामध्ये कोण टिकू शकेल?

मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून, खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्राएल ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले. आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला. तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन.

‹मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”›

‹“कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.›

‹ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.›

कारण देवाच्या घराण्यापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आता आली आहे आणि तो जर प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाचे शुभवर्तमान मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?