TSK

TSK · गण 23:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तू त्याच्याबरोबर बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखांना साहाय्य होईल आणि तुम्ही काय करावे हे तुम्हास शिकवीन.

तेव्हा परमेश्वराचा दूत बलामास म्हणाला, नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल. म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.

मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल.

मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो.

परमेश्वर म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, माझा आत्मा जो तुझ्यात आहे आणि माझे शब्द जे मी तुझ्या मुखात टाकले, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून सर्वकाळपर्यंत निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.

‹कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्याचवेळी तुम्हास शिकवील.”›