TSK

TSK · गण 24:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले.

तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल.

नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.

माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस.

मी रानात गंधसरू, बाभूळ, व मेंदीचे, जैतून वृक्ष वाढतील. मी वाळवंटात देवदारू, भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील.

माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो. अरिष्टाचा दिवस त्यांच्याविरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरुन टाक.

पाहा! अश्शूर लबानोनात सुंदर फांद्याचा, व दाट छायेचा व उंच उंचीचा गंधसरू असा होता. आणि त्याचा शेंडा फांद्यावर होता.

त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, यहूदाच्या सर्व कोरडे पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील, आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.