TSK

TSK · गण 28:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल.

आणि निरंतरचे होमार्पण व अन्नार्पणाशिवाय ते अर्पण करावे. जेव्हा ते प्राणी तुम्हासाठी अर्पण करायचे ते निर्दोष असावे; त्याबरोबरची पेयार्पणे सुद्धा अर्पावी.

पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बली देऊ नका.

त्यांनी मग हे बैल परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता.

तुम्ही असेही म्हणता की, हे किती कंटाळवाणे आहे, आणि त्याविषयी तुम्ही तुच्छतेने कुरकुर करता,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही जे जुलमाने लुटून आणलेले किंवा लंगडे किंवा रोगी या प्रकारचे तुमचे अर्पण आणता; तर आता हे मी तुमच्या हातातून स्वीकार करावे काय?