TSK

TSK · गण 29:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.

“इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी;

¶ आठव्या दिवशी तुमच्यासाठी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये.

¶ अशाप्रकारे, अजून मंदिराचा पाया बांधून झालेला नसतांनाही सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून परमेश्वरास होमार्पण अर्पण करायला सुरुवात केली.

तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षाच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता. या सभेला स्त्री-पुरुष आणि ज्यांना वाचलेले ऐकून समजत होते असे सर्वजण होते.

जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.

¶ परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. माझा प्रभू परमेश्वर, तुतारी फुंकेल आणि दक्षिणेकडून वावटळीप्रमाणे तो चालून येईल.

मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील?