तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”
TSK
TSK · 1 पेत्र 2:22
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”
‹तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही?›
कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.
तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.
तुम्हास माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्याठायी पाप नाही.