पण योवाश राजाच्या तेविसाव्या वर्षीही याजकांनी मंदिराची दुरुस्ती केली नाही.
TSK
TSK · 1 पेत्र 5:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
(तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी, जर तुला काय करायचे ते माहीत नाही तर माझ्या कळपाच्या मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूजवळच्या कुरणात चार.
मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपास तो चारील, तो कोकरास आपल्या बाहूत एकवटून त्यांना आपल्या उराशी धरून वाहील आणि तान्ह्या पिल्लांना पाजणाऱ्या मेंढ्याना तो जपून नेईल.
त्याच्या लोकांनी मोशेच्या प्राचीन काळाविषयी विचार केला. ते म्हणाले, तो देव कोठे आहे? ज्याने आपल्या कळपाच्या मेंढपाळांसोबत त्यांना समुद्रातून वर आणले, देव कोठे आहे? ज्याने आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये घातला
म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन. कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजकापर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.
आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्यास पाहा. त्याने दिलेला कळप, तुला अति सुंदर असलेला कळप कोठे आहे?
मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन व तो त्यांना चारील आणि माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांस चारील; तो त्यांच्यावर मेंढपाळ होईल.
तो मनुष्य मला म्हणाला, “या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकांकडचा यज्ञ शिजवतील.”
तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने, आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील; कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल.
मेंढरांना टाकून जाणाऱ्या निरुपयोगी मेंढपाळाचा धिक्कार असो! त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवार येवो. म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होवो आणि तो उजव्या डोळ्याने अंध होईल.
¶ ‹हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो.›
म्हणून मी तुम्हास जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे.
पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.”
स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही?
¶ बघा, मी तिसर्या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हास मिळवू पाहतो कारण मुलांनी आई-वडीलांसाठी साठवू नये पण आई-वडीलांनी मुलांसाठी साठवले पाहिजे.
¶ त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी.
त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.
¶ त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन रहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे.
तुम्ही सांभाळून राहा, यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील अशा कोणा कडूपणाच्या मुळाने अंकुरीत होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये,
सोन्याचा, रुप्याचा, हिऱ्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे;