TSK

TSK · 1 शमु 7:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.

पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याचे केस कधीच कापू नकोस कारण तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयाच्या जाचातून सोडवण्याचा आरंभ करील.”

¶ शौल राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने (दोन) वर्षे इस्राएलावर राज्य केल्यानंतर,

तेव्हा शौल व त्याच्याजवळ ते सर्व लोक जमून लढाईला गेले. आणि पाहा प्रत्येक पलिष्टी मनुष्याची तलवार आपल्या सोबत्याच्या विरूद्ध झाली म्हणून फार मोठी दाणादाण उडाली.

¶ शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.

¶ यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली.