राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गावास जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले.
TSK
TSK · 2 इति 11:6
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्या वेळी दावीद हा यहूदाच्या बेथलेहेमच्या एफ्राथी इशाय नामे मनुष्याचा पुत्र होता; त्या मनुष्यास तर आठ पुत्र होते आणि शौलाच्या दिवसात तो म्हातारा झाला होता.
¶ इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची पुत्र. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते.
यहोशाफाटाचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरूशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”
पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते सरळ ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला.
¶ तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत.