TSK

TSK · 2 इति 12:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते.

जेव्हा ते आपली जनावरे व तंबू घेऊन आले ते टोळांच्या थव्यासारखे आत आले आणि त्यांची व त्यांच्या उंटाची संख्या मोजणे अशक्य होते; असे ते देशावर आक्रमण करून नाश करावयास आले होते.

पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरून पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.

पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता त्याच्याकडे दहा लाख सैनिक आणि तीनशे रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन मारेशा नगरापर्यंत आला.

कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.

कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील.

कूशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लुबी यांची तिला मदत होती.