¶ यानंतर परमेश्वर हनानीचा पुत्र येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते.
TSK
TSK · 2 इति 20:34
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामाने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ण हकिकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत.
यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
हनानीचा पुत्र येहू हा द्रष्टा होता तो राजा यहोशाफाटाला सामोरा गेला. येहू यहोशाफाटाला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे.”