TSK

TSK · 2 इति 24:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन.

आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्याप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.

तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.

जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील, त्याच्या घरातून वाईट कधी जाणार नाही.

माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हास योग्य व बरोबर वाटेल ते माझ्यासोबत करा.

कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत. त्यांचे धनुष्ये मोडली आहेत, कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खचित प्रतिफल भरून देईल.

जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला.

आलेक्सांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील.

¶ जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते.

कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.