1 राजे 6:1
TSK
¶ अशा तऱ्हेने शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देशातून बाहेर निघाल्यापासून चारशे ऐंशी वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथ्या वर्षी. जीव महिना जो दुसरा महिना होता त्यामध्ये तो परमेश्वराचे मंदिर बांधू लगला.