TSK

TSK · 2 इति 36:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला.

¶ नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”

लोकांस परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले, संदेष्ट्यांनी लोकांस परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात.

¶ आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने स्वर्गातील देवाला चिडवून संतप्त केले. तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर खास्दी याच्या हाती दिले आणि त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांस कैद करून बाबेलला नेले.

हे देवा, तू आम्हास सर्वकाळ का सोडून दिले आहेस? आपल्या कुरणातील कळपांवर तुझा कोपाग्नि का भडकत आहे?

मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही.

यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल; कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल.

तर आता तुम्ही थट्टा करू नका, नाहीतर तुमची बंधणे घट्ट करण्यात येतील. कारण पृथ्वीवर नाश होण्याचा ठराव, मी सेनाधीश परमेश्वरापासून ऐकला आहे.

त्यांनी मला नाकार दिला, ते म्हणाले; “तो खरा नाही, अरीष्ट आम्हांवर नाही येणार, किंवा आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.

¶ यहूदाचा राजा सिद्कीया याने त्यास कैद केले होते आणि म्हणाला, तू का भविष्य करतो व म्हणतो परमेश्वर असे म्हणतो, पाहा, हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन आणि तो ते घेईल.

तुझे दास जे संदेष्टे तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार वडिल आणि देशाचे सर्व लोक हयांच्याशी बोलले तेव्हा आम्ही ऐकले नाही.

¶ ‹“हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला.›

‹म्हणजे त्यास परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील, त्याची थट्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुंकतील›

हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले.

परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत.”

अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”

म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.