TSK

TSK · 2 इति 36:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत;

त्या देशातील लोक क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत.

तर मात्र तुमचा नाश ठरलेलाच आहे हे मी तुम्हास बजावून सांगतो. यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही.

पण यशुरुन पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तो धष्टपुष्ट झाला! तो लठ्ठ झाला, तो तुकतुकीत झाला आणि त्याने आपल्या तारणकर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.

¶ सिद्कीयाने बाबेलाच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरूशलेमेवर चाल करून गेला. सिद्कीयाच्या कारकिर्दीचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा देऊन लोकांचे येणे जाणे रोखले. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.

पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांस जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्यास दगडफेक करून मारले. हे त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनातच केले.

परमेश्वर म्हणतो, “या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी कोप आणणार आहे.” यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील.

¶ आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना या जगिक राजाच्या हाती तलवार व बंदीवास, लुटालुट आणि मुखलज्जेला, आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत.

त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे.

मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही; तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे.

यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तलवार या कडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या स्त्रिया वांझ आणि विधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.

¶ परमेश्वर असे म्हणतो, जसे मी हे सर्व मोठे अरिष्ट या लोकांवर आणले आहे, तसे ज्या चांगल्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोललो आहे, त्या मी सर्व त्यांच्यासाठी करीन.

¶ आणि परमेश्वराने ते आणले आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याने केले आहे; कारण तुम्ही लोकांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे आणि त्याची वाणी पाळली नाही. म्हणून या गोष्टी तुम्हा लोकांविरूद्ध घडल्या आहेत.

परमेश्वरा, पाहा, जिच्याशी तू कठोरपणाने असे केले, तिच्या कडे लक्ष लाव. स्त्रियांनी आपल्या पोटच्या फळास, आपल्या मुलांना त्यांच्या बालपणातच, खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात याजक व संदेष्टे मारले जावेत काय?

ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यानंतर प्रवेश कर, व मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.

मग ते तुझ्या विरुध्द लोक जमा करून तुला धोंडमार करतील व तलवारीने तुझे तुकडे करतील.

म्हणून आता परमेश्वराने अरिष्टावर नजर ठेवून ते आम्हावर आणले आहे, कारण परमेश्वर आमचा देव जी सगळी कामे करतो त्यामध्ये तो न्यायी आहे; आणि आम्ही त्याचा शब्द मानला नाही.

¶ त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी, पिलाताने गालील प्रांतातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले होते, त्याविषयी सांगितले,