योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.”
TSK
TSK · प्रेषि 14:15
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणीही नाही.
अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल.
तेव्हा दावीदाने आपल्याजवळ उभ्या राहिलेल्या लोकांस म्हटले, “जो मनुष्य त्या पलिष्ट्याला मारील आणि इस्राएलापासून अपमान दूर करील त्यास काय प्राप्त होईल? हा बेसुनती पलिष्टी कोण आहे की ज्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानावे?”
बाशा आणि त्याचा पुत्र एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध झाला.
परमेश्वर तुझा देव कदाचित रब-शाकेचे सगळे शब्द ऐकेल, त्याचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे. आणि जी वचने परमेश्वर तुझा देव याने ऐकली आहेत, त्यांचा कदाचित तो निषेध करील. म्हणून जे शेष राहिले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा.”
जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली.
कोणी विचार करीत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही ते म्हणतात, मी लाकडाचा एक भाग अग्नीत जाळला; होय, मी त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली. मी त्याच्या निखाऱ्यावर मांस भाजले व खाल्ले. आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या लाकडाचा आराधनेसाठी काहीतरी ओंगळ बनवू काय? मी लाकडाच्या ठोकळ्याच्या पाया पडू काय?
जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या. जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही.
पाहा! माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दूर असलेल्या देशातून येतो. “परमेश्वर सियोनात नाही काय? किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय?” मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरुपयोगी मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे.
ते सर्व पशूसारखे आणि मूर्ख आहेत, दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्तींचे अनुयायी आहेत.
ज्ञानाशिवाय, प्रत्येक मनुष्य अज्ञानी झाला आहे. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार लाजवले जातात. कारण त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. त्यामध्ये काही सजीवपणा नाही.
अहा, प्रभू परमेश्वरा! पाहा! तू एकट्याने आपल्या महान सामर्थ्याने व आपला उभारलेल्या बाहूने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुला खूप अवघड आहे असे म्हणण्यास काहीच नाही.
¶ मी असे जाहीर करतो की, माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपीत होऊन दानीएलाच्या देवाचे भय धरावे; कारण तो सर्वकाळ जिवंत देव आहे. त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभूत्व अनंत आहे.
जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात.
शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
‹जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.›
ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे.
पण पेत्र म्हणाला, “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.”
आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
¶ आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.
¶ पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.
‹या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.›
बराच काळपर्यंत लोकांस उपवास घडल्यावर, मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता, म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हास टाळता आली असती.”
¶ कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही.
¶ म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.
तरी मला उशीर लागल्यास, देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.
आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.”
परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर.”