पण सीहोन राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो रानाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले.
TSK
TSK · अनु 3:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पुढे परमेश्वर मला म्हणाला, “आता उठा व आर्णोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन व त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्यास लढाईला प्रवृत्त कर.
ते अशी, “इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करून जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका शत्रूला पाहून घाबरु नका.
तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरूशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.”
घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन.
आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत.