¶ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी म्हणून मी हे केले.
TSK
TSK · निर्ग 20:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पुढील काळी तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यांना सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले.
मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
¶ कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये.
¶ तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
मिसर देशामध्ये तुम्ही गुलामीत होता तेथून मी तुम्हास बाहेर काढले, तो मी परमेश्वर, तुमचा देव आहे.
हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.
मरेपर्यंत त्यास दगडमार करावी; कारण मिसरमधून ज्याने तुम्हास दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हास बहकवायचा प्रयत्न करत आहे.
¶ तुम्ही शत्रूवर चाल करून जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमच्याबरोबर आहे.
तेव्हा मी तुम्हाला असे सांगितले की, “मी तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहत आहा, त्यांच्या देवांना भिऊ नका, तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही.”
परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते, त्याच्याविरुध्द पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले.
आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामाच्या राजाच्या हातून आहाजाचा पराभव करविला. अरामाच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजाचा पाडाव करून यहूदाच्या लोकांस कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजाचा पराभव करवला.
तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.
परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही.
¶ परमेश्वर असे म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व कुळांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”
प्रभू परमेश्वर म्हणतो, मी ज्या दिवशी इस्राएलास निवडून घेतले आणि माझे हात वर याकोबाच्या वंशजांना शपथ वाहिली आणि मिसर देशात त्यांना प्रकट झाले, मी माझे हात उंचावून शपथ वाहिली मी तुमचा परमेश्वर देव असे म्हणतो.
मी संदेष्टयांशी देखील बोललो आहे. आणि त्यांना मी पुष्कळ दृष्टांत दिले आहेत, मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.
किंवा देव केवळ यहूद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचा ही आहे.