राजाच्या हुकूमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र गोंधळून गेले.
TSK
TSK · यहे 21:10
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.
मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता पण त्यांना परमेश्वराची कार्ये त्यांना दिसत नाहीत, किंवा त्याच्या हातची कामे ते विचारात घेत नाहीत.
ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.
नेगेबच्या रानाला बोल ऐक परमेश्वर देव काय जाहीर करतो; परमेश्वर देव हे म्हणतोय, बघ मी तुझ्यावर अग्नी पाठवीन. ती सर्व झाडाच्या ताज्या फळांना भस्म करेल व झाडे सुकवून टाकेल. आग विझणार नाही; सर्व उत्तर, दक्षिण भाग जळून भस्म होईल.
तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.
ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे, आपल्या स्वत:च्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.
चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दूर गेले आहेत!
‹आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात› ‹तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील.›