TSK

TSK · यहे 21:15

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.

मी माझे मुख त्यांच्या दृष्टीआड करेन, जरी ते आग्नीतून बचावतील तरी अग्नी त्यास भस्म करेल. मी त्यांच्या दृष्टीआड होईल तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे.

मग ते तुला विचारतील काय झाले? तू का विव्हळतोस? मग तू त्यांना सांग कारण अशी बातमी येत आहे, प्रत्येक हृदय क्षीण होईल, प्रत्येक हात अडखळेल आणि प्रत्येक गुडघा पाणी पाणी होईल, पाहा! असे घडून येत आहे आणि ते तसेच होईल “असे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.”

यरूशलेमेबद्दल पुढे घडून येणारी गोष्ट त्याच्या उजव्या हातात असेल, किल्ल्याचे दरवाजे फोडण्याचे हत्यार त्याविरूद्ध असेल, त्यांच्या तोंडातून मारण्याचा, युध्दाची ओरड! त्यासाठी हत्यार वेशीसाठी तयार केले, त्यासाठी मातीचे टेकाड बुरुज बांधावे.