शेथलाही मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने धावा करू लागले.
TSK
TSK · उत्प 12:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
जेथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला.
तेव्हा इसहाकाने तेथे वेदी बांधली व परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याने तेथे आपला तंबू ठोकला आणि त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली.
लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला.
नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले.
बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले,
इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा कोणी पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर पूर्ण सोडून देऊन आणि उघडे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला.
आणि बेथ-अराबा व समाराइम व बेथेल;
तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे.
नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
जसे परमेश्वराने म्हटले, जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल. जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील, आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो, ते बाकी वाचलेल्यात राहतील.
यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे,