TSK

TSK · उत्प 14:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.

म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.”

आणि आकाशाचा देव व पृथ्वीचा देव जो परमेश्वर, याची शपथ मी तुला घ्यायला लावतो की, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींतून तू माझ्या मुलांसाठी पत्नी पाहणार नाहीस.

सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्वकाही परमेश्वर देवाचे आहे.

तेव्हा असे झाले की त्याने तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून म्हटले, “हाय! माझ्या मुली! तू मला दु:खाने पिळून टाकले आहे, आणि मला दुःख देणारी यामध्ये तूही आहेस! मी परमेश्वराकडे शपथ वाहिली आहे; यास्तव मला वचनाविरूद्ध वळता येत नाही.”

हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस.

नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.

¶ या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्नेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाली, मी सर्वोच्च देवाचे आभार मानले, जो सदाजिवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली, कारण त्याचे प्रभूत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.

रुपे माझे आहे, सोने माझे आहे! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.