TSK

TSK · उत्प 26:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील,

मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल.

त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा

कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील.

पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.”

राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो; सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो; त्याच्यात लोक आशीर्वादित होतील; सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.

आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’

विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली.