TSK

TSK · उत्प 26:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

म्हणून, तू माझी बहीण आहेस, असे तू लोकांस सांग. म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि ते मला मारणार नाहीत, अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.”

अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले.

शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे.

मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो.

पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,