TSK

TSK · उत्प 38:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत तू तुझ्या वडिलाच्या घरी जाऊन तेथे विधवा म्हणून राहा.” कारण त्याने विचार केला, “नाही तर, तोसुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे मरून जाईल.” मग तामार आपल्या वडिलाच्या घरी जाऊन राहिली.

यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल),

यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ

¶ यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली.