TSK

TSK · उत्प 41:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.

अबील मरोदखने त्यास तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.

¶ तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.

तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले.

कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुरुंगातून राज्य करायला बाहेर आला असेल.

मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो. कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.

अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले.