TSK

TSK · उत्प 46:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुल्लाम नगरातील हिरा नावाच्या मनुष्याबरोबर त्याच्या घरी रहावयास गेला.

त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले.

परंतु यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्यास ठार मारले.

या नंतर तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझी सुन तामार हिने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या व्यभिचारामुळे ती आता गरोदर राहिली आहे.” यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढा व जाळून टाका.”

यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील.

¶ यहूदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली;

पेरेसाच्या कुळातील ही कुळेः हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.

परमेश्वर म्हणाला, “यहूदा तुमचे नेतृत्व करील; पाहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे.”

¶ एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.

¶ आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते. अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ; अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,

¶ यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली.

¶ ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र.

राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांस सांगत असे. पथह्या हा मशेजबेल याचा पुत्र. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र.

¶ अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ.

परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”