¶ म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.”
TSK
TSK · उत्प 6:17
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.”
¶ मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले.
¶ अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले.
आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल.
तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे. अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच, त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही!
महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
“कारण नोहाच्या जलाप्रमाणे हे मला आहेः जशी मी शपथ घेऊन म्हणालो नोहाचा जलप्रलय पुन्हा कधीही भूमीवर चालणार नाही, तशी मी शपथ घेतली मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुला धिक्कारणार नाही.
परमेश्वर देवाचा शब्द ऐका! असे इस्राएलाच्या पर्वताला जाऊन सांग, देव त्या पर्वत, दऱ्याखोऱ्यांना, झऱ्यांना सांगत आहे; ऐका! मी तुमच्या विरुध्द तलवार चालवीन, आणि मी तुमचे उच्चस्थान उध्वस्त करील.
म्हणून, प्रभू परमेश्वर, त्यांना असे म्हणतो, पाहा! मी स्वत: पुष्ट मेंढी आणि बारीक ह्यांच्यात निवाडा करीन.
ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या, आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे, जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे.
‹नोहाने तारवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत ते खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करुनही देत होते.›
म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.
कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली;
नोहाच्या दिवसात, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले.