TSK

TSK · होशे 5:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे.

तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता? तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे.

हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.

परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली.

यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून तर गेली तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन माझ्याकडे येत आले आहे, मी तेव्हापासून आजपर्यंत तुम्हास ते ऐकवित आलो. पण तुम्ही ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही.

म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे, माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे. तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे.

कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे, तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत.

त्या बंडखोर नगरीला हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे.

¶ मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.