कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.
TSK
TSK · यश 46:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, हे देवा, मला सोडू नको.
ते नाहीसे होईल, पण तू राहशील; ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील; कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.
यादिवसापासून मीच तो आहे, आणि माझ्या हातातून कोणीही सोडवू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्याने परत बदलू शकेल?
¶ इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे आणि त्याचाही जो आपल्या वस्राबरोबर म्हणजे पत्नीबरोबर हिंसेने वागतो त्याचाही मला तिटकार आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि अविश्वासू असू नका.”
कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात.
¶ येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.