TSK

TSK · यश 46:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हाला जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हाला त्यांच्या हातातून सोडवले.

जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला.

दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते भविष्य सांगत होते. पण काहीही घडले नाही बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!

¶ तेव्हा असे झाले की, तो आपला देव निस्रोख याच्या घरात पूजा करीत असताना, त्याची मुले अद्रम्मेलेक व शरेसर यांनी त्यास तलवारीने ठार मारले, मग ते अरारात देशात पळून गेले, नंतर त्याचा मुलगा एसरहद्दोन त्याच्या जागी राज्य करू लागला.

जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या. जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही.

तर तुम्ही स्वत:साठी घडविलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हास सोडावयास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे. कारण हे यहूदा, तुझ्या शहरांइतक्या तुझ्या मूर्त्या आहेत!

यहूदातील शहरे व यरूशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांस मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.

तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता.