TSK

TSK · यश 48:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत; ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ.

“मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या. मी त्या अचानक करु लागलो, आणि त्या घडून आल्या.

कारण, सेनाधीश परमेश्वराने माझे गौरव केले आणि तुम्हास लुटणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध मला पाठवले आहे; जो कोणी तुला स्पर्श करतो तो देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो! परमेश्वराने हे केल्यानंतर, तो म्हणाला,

कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.

तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, ‹“तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.”›