TSK

TSK · यश 5:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

बऱ्याच काळानंतर मिसराचा राजा मरण पावला. तेव्हा इस्राएलांनी दास्यामुळे कण्हून आक्रोश केला. त्यांनी मदतीकरता हाका मारल्या व दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत देवापर्यंत वर जाऊन पोहचला;

उपऱ्याचा छळ करू नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता.

¶ तेव्हा मनुष्यांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहूदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली.

हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात. दिनांची आरोळी त्याच्या कानी गेली.

हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे, जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर.

कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.

अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस व किती गोड आहेस.

विश्वासू नगरी वेश्या कशी झाली! ती जी की पूर्णपणे न्यायी होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती, पण ती आज खुन्यांनी भरून गेली आहे.

म्हणून सियोनेच्या कन्यांच्या डोक्यात प्रभू देव रोगग्रस्त खरूज उत्पन्न करील, आणि परमेश्वर त्यांचे टक्कल करील.

चांगले करण्यापासून लांब राहणाऱ्या कठोर मनाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐका.

जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील. जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील.

इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. त्याची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.

तू मला अन्याय व अनर्थ का पाहायला लावतोस? नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत; आणि भांडण व वाद उठतो!

सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की “जे सत्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर प्रेम व करुणा दाखवा. प्रत्येक मनुष्याने आपल्या बंधू बरोबर असे वागावे.

¶ ‹परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता; पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: न्याय, दया व विश्वास या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत; पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडावयाच्या नव्हत्या.›

‹माझ्यातील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणार्‍या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूफ करतो.›

पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दुःख करीत आहे आणि ते रडणे सैन्याच्या परमेश्वराच्या कानी पोहोचले आहे.