TSK

TSK · यश 64:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.

फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.

पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस.

देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.

तेव्हा भूमी कापली; देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला, देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.

त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली.

¶ अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील,

तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली; त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला. सर्वकाळच्या पर्वतांचेसुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्वकाळच्या टेकड्या खाली नमल्या, त्याचा मार्ग सदासर्वकाळ आहे.