ईयो 23:9
TSK
उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही.
कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.
मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.
प्राचीन काळच्या, पूर्वीच्या गोष्टीबद्दल विचार करा, कारण मी देव आहे आणि दुसरा कोणी नाही, मी देव आहे आणि माझ्यासारखा कोणीच नाही.
¶ अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?