देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?
TSK
TSK · ईयो 23:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांस ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो.
मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.
¶ देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार आहे असे मी समजतो. त्याच्यात अधिक काही मिळवू शकत नाही आणि त्याच्यातून काही कमीही करू शकत नाही. कारण लोकांनी त्याच्याजवळ आदराने यावे म्हणून देवाने हे सारे केले आहे.
मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे. मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.”
भूतलावरील सर्व रहीवासी त्यास शुन्यवत आहेत. तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो, कोणीही त्यास थांबवू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की “तू हे का केले?”
देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली.