TSK

TSK · यहो 7:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीजवस्तू लुटल्या, कारण त्यांनी त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते.

तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हास दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ती म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु. तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकण्यातही नसलेले हे दैवत असेल

तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वदा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल, तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल.

यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे अपराध केले आहे.

लोकांस एकत्र जमवा, मंडळीला पवित्र करा. वडिलांना एकत्र करा, मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकाना एकत्र जमवा. वर आपल्या खोलीतून आणि वधूही आपल्या मंडपातून बाहेर येवो.

‹अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल.›

पण आता, मी तुम्हास लिहिले आहे की, ख्रिस्तात बंधू म्हणलेला असा कोणी जर व्यभिचारी, लोभी किंवा मूर्तीपुजक, निंदक, पिणारा किंवा लुबाडणारा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवू नका; अशा मनुष्यांबरोबर जेवूही नका.