देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
TSK
TSK · विला 2:16
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
“आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.
ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो.
दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.
जरी तू कचरा आणि उजाड अशी होती, आणि उध्वस्त झाली होती. तर आता राहाणाऱ्यांस फार संकुचित होशील आणि जे तुला गिळत असत ते फार दूर होतील.
प्रत्येकजण जो कोणी त्यांच्याकडे बाहेर गेला त्यांनी त्यास खाऊन टाकले. त्यांचे शत्रू म्हणाले, आम्ही दोषी नाही, कारण परमेश्वर त्यांचे खरे राहण्याचे ठिकाण आहे, परमेश्वर जो त्यांच्या पूर्वजांची आशा त्याच्याविरुध्द त्यांनी पाप केले आहे.
यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे.
आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरूद्ध आपले तोंड वासले आहे.
¶ प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तू तुझ्या बहिणीचा प्याला पिणार आहेस, जो खोल व मोठा आहे, तू मस्करीचा व उपहासाचा विषय बनशील या प्याल्यात मोठा भरणा असेल.
कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, की तू इस्राएल देशाविरूद्ध टाळ्या वाजविल्या व तुझे पाय आपटले व आपल्या मनापासून तुच्छतेने आनंद केलास.
“म्हणून तू भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, ‘कारण त्यांनी तुमचा नाश केला आणि तुम्ही उरलेल्या राष्ट्रांना वतन व्हावे म्हणून त्यांनी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही लोकांच्या तोंडी व जिभेने व गोष्टीचा निंदेचा विषय असे झाले आहात.”
¶ परंतु तू आपल्या भावाचा दिवस, त्याच्या विपत्तीचा दिवस पाहू नकोस, आणि तू यहूदाच्या वंशजास नाशाच्या दिवशी आनंद वाटू देऊ नको. संकटाच्या दिवशी तू गर्वाने बोलू नको.
मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत. त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली व त्यांच्या सीमांचे उल्लंघन केले आहे.