TSK

TSK · लेवी 14:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग एजोब झाडाची जुडी घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळावी आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळपट्टीवर लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.

¶ त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.

¶ याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी;

त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;

शुद्ध मनुष्याने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या मनुष्यांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मरण पावलेल्या मनुष्याच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.

कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमिजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले.