TSK

TSK · लूक 3:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ज्या वेळेस परमेश्वर सियोनेच्या कन्यांची अशुद्धता दूर करेल, आणि यरूशलेमेच्या गर्भातील रक्ताचे डाग त्याच्या न्यायाच्या आत्म्याने व ज्वलंत अग्नीच्या आत्म्याने स्वच्छ करील तेव्हा हे होईल.

कारण मी तहानलेल्या जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रवाह वाहतील. मी तुझ्या संततीवर आपला आत्मा आणि तुझ्या मुलांवर आपला आशीर्वाद ओतीन.

ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन, आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील.

¶ त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण टिकून राहणार? आणि जेव्हा तो दिसेल तेव्हा कोण उभा राहिल? कारण तो शुद्धकरणाऱ्या अग्नीसारखा आणि परीटाच्या खारासारखा आहे.

तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.

मी तर त्यास ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की, ‘तू ज्या कोणावर आत्मा उतरत असतांना आणि स्थिर राहिलेला पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’

‹कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा; थोडया दिवसानी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”›

देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.

¶ पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला.

येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.

कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच पवित्र आत्म्याने भरण्यात आले.