TSK

TSK · लूक 7:38

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्राएल लोकांस हे शब्द बोलला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले

मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.

देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.

सर्वदा तुझी वस्त्रे शुभ्र असावी आणि तुझ्या डोक्यास तेलाचा अभिषेक असावा.

तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस. तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस.

ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन. ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.

“तरी आताही” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. रडा, शोक करा आणि उपवास करा.”

‹‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, › ‹कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’›

तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, ‹“ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले.›

येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला.

दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो.