TSK

TSK · लूक 8:28

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पीडा द्यायला येथे आलेला आहेस काय?”

येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला.

तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी आला.

एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात.

जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.

आणि त्यांना फसविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंघकाच्या सरोवरात टाकण्यात आले; तो पशू व तो खोटा संदेष्टा हे; तेथेच असून ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा भोगतील.