TSK

TSK · मत्त. 1:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ नंतर नूनाचा पुत्र यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले, त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषतः यरीहो शहर हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.

त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले.

¶ याप्रमाणे नामी तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेम नगरात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.

नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र.

दावीद इशायाचा, इशाय ओबेदाचा, ओबेद बवाजाचा, बवाज सल्मोनाचा, सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.

तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्‍या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय?