देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटानी त्यांना त्रस्त केले होते.
TSK
TSK · मत्त. 24:7
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
देव म्हणतो, मी मिसऱ्यांना मिसराविरूद्ध चिथावेल, ते माणसे आपल्या भावाविरूद्ध, आणि आपल्या शेजाऱ्याविरूद्ध; नगर नगराविरूद्ध आणि राज्य राज्याविरूद्ध लढेल.
कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरूशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल, तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो.
मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे आणि तेथे रक्त, अग्नी व दाट धुराचे खांब दाखवीन.
यरूशलेमेशी लढावयास मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांना लुटतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे-अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांस नगरीतून नेले जाणार नाही.
‹मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.›
आणि वर आकाशात अद्भूते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन.
“पुन्हा एकदा” याचा अर्थ असा होतो की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलवता येत नाहीत त्या तशाच राहतील.
¶ त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला;