‹म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.›
TSK
TSK · मत्त. 9:37
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तो त्यांना म्हणाला, ‹“पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत, यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.”›
‹अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हास म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.›
‹मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”›
¶ म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.
¶ जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.